इराणची शक्तिशाली युद्धनौका आग लागून बुडाली

तेहरान – इराणी नौदलाची एक युद्धनौका ओमानच्या समुद्रात आग लागून बुडाल्याची घटना घडली आहे. काल रात्री सव्वा दोनच्या सुमाराला ही आग लागली. ती विझवण्यात यश आले नाही. त्यात संपुर्ण जहाजच नष्ट झाले आणि ते समुद्राच्यातळाशी बुडाले.

खर्ग असे या युद्धनौकेचे नाव होते. इराणी नौदलासाठीची एक शक्तिशाली युद्धनौका मानली जात होती. या युद्धनौकेतून मोठ्या प्रमाणात युद्धसामग्री व माल वाहून नेण्याची क्षमता होती. तसेच त्यावरून हेलिकॉप्टर उडवण्याची व उतरवण्याचीही सोय होती.

या जहाजाची बांधणी ब्रिटन मध्ये करण्यात आली होती व 1987 पासून ते इराणच्या नौदलात कार्यरत होते. या जहाजावर नेमकी कशाने आग लागली हे मात्र अजून इराणने जाहीर केलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here