करुणामयी अस्वस्थता कलावंतांना समाजकार्यासाठी ऊर्जा देते

कै.सुपडू सुतार यांच्या पोट्रेट अनावरण प्रसंगी चित्रकार मिलिंद विचारे यांचे प्रतिपादन

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – करुणामयी अस्वस्थता कलावंतांना समाजकार्यासाठी अक्षय ऊर्जा देते,असे प्रतिपादन सुप्रसिद्ध शिव चित्रकार मिलिंद विचारे यांनी केले.सामाजिक कार्यकर्ते विजय लुल्हे यांनी पिताश्री सुपडू सुतार यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दिनांक 1 जून 2021 रोजी जळगाव येथील विश्वकर्मा पांचाळ सहाय्यक मंडळास देणगी दिली त्या कार्यक्रमाच्या औचित्याने चित्रकार सुनील दाभाडे यांनी अण्णासो सुपडू सुतार यांच्या केलेल्या पेंटिंगचे अनावरण चित्रकार विचारे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विचारे मार्गदर्शन करतांना बोलत होते.जळगाव येथील सुतार समाज कार्यालयाच्या जिल्हा पेठ मधील वस्तीगृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष अरुण जाधव असून प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते राजाराम लुल्हे,मनोहर रूले,चित्रकार सुनील दाभाडे,मातोश्री सिंधु सुतार,सौ.इंदुमती लुल्हे,संजय वाघ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्षांच्या हस्ते प्रभु विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे व कै.सुपडू सुतार यांच्या प्रतिमेचे पूजन मातोश्री सिंधु सुतार यांच्या हस्ते करून माल्यार्पण करण्यात आले.प्रस्तावनेत संयोजक विजय लुल्हे पिताश्री कै.सुपडू सुतार यांच्या गौरवार्थ म्हणाले की,”तत्वनिष्ठता,निर्भयता,समायोजनशीलता,कर्तव्यतत्परता व कलासक्ती ही त्यांच्या समर्पणशील कार्याची यशस्वी पंचसुत्री होती.व्यथावेदनांच्या पर्वातही त्यांचं समग्र जीवन मूल्यांचा महासागर होता.”

milind-vichareकोरोना महामारीच्या काळात लॉक डाऊनचे शासकीय निर्बंध असल्याने विजय लुल्हे यांनी वडिलांचे उत्तरकार्य मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत केले परिणामी परंपरागत जेवणावळीचा खर्च वाचला.परंतू पितृऋण व सामाजिक उत्तरदायित्वाने पांचाळ सुतार समाज वस्तीगृहाच्या बांधकामासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय लुल्हे यांनी अकरा हजार देणगीचा धनादेश मातोश्री श्रीमती सिंधु सुतार यांच्या हस्ते मंडळाचे अध्यक्ष अरुण जाधव यांना प्रदान केला.त्यावेळी सुकन्या सुवर्णा लुल्हे व समिक्षा लुल्हे उपस्थित होत्या.सदरहू कार्यक्रम जळगाव शहर महानगर पालिका आयुक्त यांच्या परवानगीने तसेच शासनाने निर्धारीत केलेल्या अटी व शर्थीचे पालन करून घेण्यात आला.कार्यक्रमास मंडळाचे सचिव एम.टी.लुले साहेबांचे मार्गदशन मिळाले.

शिव चित्रकार मिलिंद विचारे यांचा सत्कार अध्यक्ष अरुण जाधव व चित्रकार सुनील दाभाडे यांचा भावपूर्ण सत्कार चित्रकार मिलिंद विचारे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन करण्यात आला.द्वितीय सत्रात कै.सुपडू सुतार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ औषधी वनस्पतींचे रोपण वस्तीगृहाच्या प्रांगणात राजाराम रुले,सौ.इंदुमती रूले,सुवर्णा लुल्हे,समिक्षा लुल्हे पर्यावरणप्रेमी विजय लुल्हे,संजय वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात अरुण जाधव म्हणाले की,” पितृछत्र कोरोनाने हिरावून घेतले उपचारात आर्थिक संकटे आली तरी संकटे विसरून बांधकामास देणगी देऊन पिताश्रींचा सामाजिक वारसा विजय लुल्हे चालवित आहेत. शैक्षणिक,सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात अखंड कार्य करीत असल्याबद्दलही लुल्हें बद्दल गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाची प्रस्तावना विजय लुल्हे,सुत्रसंचालन सुवर्णा लुल्हे व आभार प्रदर्शन समिक्षा लुल्हे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जनमत प्रतिष्ठान अध्यक्ष पंकज नाले,प्राचार्य राजेंद्र महाजन,इंजिनियर संजय भावसार,मनोहर बाविस्कर सर,संजय वाघ,बाळकृष्ण मिस्तरी यांनी अमूल्य परिश्रम घेतले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here