अक्कलकोट (तालुका क्राईम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) – तालुक्यातील बोरगाव दे. येथील जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक बनाजी बोळकोटे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त बोरगाव येथील इंदिरा नगर मित्र परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना बोळकोटे म्हणाले प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत असताना बोरगाव च्या जिल्हा परिषद शाळा परिसरात राहणाऱ्या तरुणांचे योगदान मी विसरू शकत नाही. अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला काम करताना कांही विकृत मानसिकतेच्या लोकांचा त्रास होत असतो. परंतु बोरगाव मध्ये मला वेगळा अनुभव आला. येथील तरुणांनी नेहमीच मला शाळा प्रशासन चालवताना मोलाचे सहकार्य केले. ज्या परिसरात शाळा आहे त्या वार्डाचे ग्रामपंचायत सदस्य महंमद पठाण आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी शाळेच्या संरक्षकाची भूमिका बजावली. शाळेचे साहित्य, साधने, प्रत्येक बाब आपली स्वतःची समजून त्याची देखभाल केली हे माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य महंमद पठाण, सलीम पठाण, सद्दाम मुजावर, खलील पठाण, करीम मुजावर, मुस्तफा ताची, मदार जमादार, शरीफ सलगरे, युनूस पठाण, सुभाष हडपद उपस्थित होते.






