केंद्र शासनाला सात वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपतर्फे रिक्षाचालकांना धान्य किटचे वाटप

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाला सात वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजप नगरसेवक हरिदास चरवड यांच्या वतीने 1 ते 9 जून या कालावधीत सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या अंतर्गत वडगाव बुद्रुक मधील साईराज रिक्षा संघटनेच्या सदस्यांना अन्नाधान्य किटचे वाटप करण्यात आले. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकर यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.

खडकवासला विधानसभा भाजपा अध्यक्ष सचिन मोरे, केदार जाधव, चंद्रकांत पवळे, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी राहुल महाडिक विष्णू कोळेकर किरण रणदिवे भाऊ अकोलकर बबन नागपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. या सेवा सप्ताह अंतर्गत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमामध्ये रिक्षाचालक अनुदान फॉर्म, नोंदणी घरेलू महिला कामगार नोंदणी, वडगाव बुद्रुक परिसरातील नाभिक बांधवांना मदत ,वृक्षारोपण, वृद्धाश्रमात फळे वाटप तसेच अनाथाश्रमात अन्नधान्य वाटप, पोलीस कर्मचाऱ्यांना तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना कोरोना रक्षक साहित्याचे वाटप इत्यादी उपक्रम घेण्यात येणार असल्याचे चरवड यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here