हिंदू धर्माचे शिक्षण घेऊन धर्माचरण केल्याने व्यक्तीचे मनोबल वाढते ! – नंदकुमार जाधव, सनातन संस्था

हिंदू धर्माचे शिक्षण घेऊन धर्माचरण केल्याने व्यक्तीचे मनोबल वाढते ! – नंदकुमार जाधव, सनातन संस्था
‘तणावमुक्त जीवन आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान संपन्न !

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘तणावमुक्त जीवन आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर 31 मे या दिवशी ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानास सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी ‘तणावमुक्त जीवन’ आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. कान्हादेश (खान्देश), मराठवाडा येथील 1000 हून अधिक धर्मप्रेमी ऑनलाईन उपस्थित होते.

या वेळी सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव म्हणाले, कोरोनाने किती भीषण परिस्थिती निर्माण केली आहे, हे सर्वजण अनुभवत आहेत. यापुढचा काळ तर आणखी भयावह आहे, असे अनेक संत, द्रष्टे, भविष्यवेत्ते, भाकीत सांगणारे आणि नॉस्ट्रॅडेमस यांनी सांगितले आहे. अशा भीषण काळात आपले रक्षण होणे, आपण जीवंत रहाणे, हे केवळ ईश्वररी कृपेवर अवलंबून असते. ईश्वअर कृपा करतो ते भक्तावर, साधना करणार्या,वर. गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे. ‘न मे भक्त: प्रणश्यति’ म्हणजे माझ्या भक्तांचा नाश होत नाही. म्हणजे ईश्वहराची कृपा मिळवायची तर धर्मशिक्षण घेऊन साधना करणे आवश्यक आहे.

ते पुढे म्हणाले, 1. येणाऱ्या काळात महापूर, वादळे, भूकंप, ज्वालामुखी उद्रेक अशी नैसर्गिक संकटे येणार असे सांगितले आहे. आपण ते अनुभवत आहोत. नुकतेच तौक्ते वादळ त्यानंतर यास वादळाने नुकसान केले. उत्तराखंड महापूर. बर्याेच ठिकाणी आगी लागल्याचे आपण ऐकले. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते आहे, त्यामुळे समुद्र किनारी असणारी शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. मागील आठवड्यात कांगो देशात ज्वालामुखीचा उद्रेक झाला. 2. सर्वात मोठे संकट म्हणजे तिसरे जागतिक महायुद्ध ! ते होण्याचा कालावधी २ ते ३ वर्षे असा आहे. त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होणार. कारण आज प्रत्येक देशाकडे परमाणू बॉम्ब, क्षेपणास्त्रे आहेत. त्याची संहारकता प्रचंड आहे. असा आपत्काळ का येतो याविषयी कौशिक पद्धती या ग्रंथात वर्णन आहे. म्हणून साधना आणि धर्मशिक्षण ही काळाची आवश्यकता आहे.

देश ‘हिंदु राष्ट्र’ घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती वर्ष 1947 ला देशाची फाळणी झाली. इस्लाम राष्ट्र म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाली. मग उर्वरित राष्ट्र ‘हिंदु राष्ट्र’ घोषित व्हायला हवे होते; मात्र तसे झाले नाही. वर्ष 1976 ला 42 वी घटनादुरुस्ती करत देशाला ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ घोषित करण्यात आले. जगात 157 ख्रिस्ती, 52 मुस्लीम, 12 बौद्ध आणि 1 ज्यूंचे राष्ट्र आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 80 टक्के हिंदू असतांना भारताला हिंदु राष्ट्र म्हणून का घोषित केले जात नाही? देश ‘हिंदु राष्ट्र’ घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही, असे प्रतिपादन श्री. सुनील घनवट यांनी केले.

ते पुढे म्हणाले, आत्तापर्यंत देशाचे अनेक तुकडे झाले. वर्ष 1876 ला अफगाणिस्तान, 1904 ला नेपाळ, 1906 ला भूतान, 1947 ला पाकिस्तान, 1971 ला बांग्लादेशची निर्मिती झाली. आता आपण अखंड हिंदु राष्ट्राची मागणी जोरकसपणे करायला हवी. लडाख, मिझोराम, नागालँड, मेघालय, मणीपूर, अरुणाचल प्रदेश, लक्षद्वीप, काश्मीर, पंजाब या 9 राज्यांत हिंदु संख्येने अल्प झाले आहेत. दुसरीकडे अल्पसंख्याकांसाठी देशात विशेष कायदे, आयोग, मंत्रालय, अधिकार, शैक्षणिक संस्था, सुविधा पुरवल्या जातात. अशा सुविधा हिंदूंना आहेत का ? अशा वेळी कुठे जाते धर्मनिरपेक्षता? समता, न्याय, बंधुता ? पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी इदनिमित्त मलेरकोटला हा जिल्हा मुस्लिमबहुल जिल्हा म्हणून घोषित केला. त्याच न्यायाने हिंदूंची संख्या जास्त असलेल्या भागाला ‘हिंदुबहुल’ का घोषित केले जात नाही ? भगवी वस्रे घालून ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून हिंदूंचा बुद्धिभेद केला जात आहे. ‘अनफोल्डिंग वर्ल्ड’ या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिव्स (पाद्री) जाहीरपणे सांगतात की, मागील 25 वर्षांत आम्ही जे धर्मांतराचे काम करू शकलो नाही, ते कोरोना महामारीच्या दीड वर्षात केले. 5 सहस्र गावातील 1 लाखाहून अधिक लोकांचे धर्मांतर केले. उल्हासनगर येथील लाखहून अधिक सिंधी बांधवांचे धर्मांतर करण्यात आले आहे. त्यासाठीच आता हिंदूंनी गांभीर्याने हिंदू राष्ट्र स्थापनेचा विचार करायला हवा.

कार्यक्रमास शंखनादाने प्रारंभ झाला. व्याख्यानाचा उद्देश आणि समितीच्या कार्याचा परिचय समितीचे नांदेड जिल्हा समन्वयक श्री. वैभव आफळे यांनी सांगितला. सूत्रसंचालन श्री. श्रेयस पिसोळकर यांनी केले. ज्या हिंदू बांधवांना विनामूल्य ऑनलाइन धर्मशिक्षण वर्गात सहभागी व्हायचे असेल त्यांनी कृपया 8830212614 या क्रमांकावर सम्पर्क करावा असेही आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here