महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व सर्व समाज बांधवांना अनिल महाजन यांचे आवाहन

सर्व प्रथम माझ्या कडून राज्यातील महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या सर्व नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांना समाज कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा जातीसाठी माती खा पण आपला माळी समाज एकत्र करा मी आपल्या पाठशी आहे.- अनिल महाजन
सर्व समाज बांधवांना जय जोती जय क्रांती
समाजात काम करत असताना आपल्याला काही आपलेच लोक समाज कार्य करण्या पासून थांबवतील पण अशा स्वार्थी लोकांकडे लक्ष देऊ नका कारण ह्या लोकांना तुमची प्रगती बघवत नाही. आताचा तरुण मुलगा किंवा सर्व सामान्य समाज बांधवाला महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे पद लावून समाजात मान-सन्मान मिळतो. हे या लोकांना बघवत नाही कारण ते कच्चा कानाचे असतात मग ते आपले असो की इतर जातीचे आपण आपलं कार्य चालू ठेवावे आपल्या सर्वांना एक उदाहरण देतो आपले समाजातील काही लोक म्हणतात की माळी समाजाच्या इतक्या संघटना तितक्या संघटना आहे समाज बांधवानो त्यांना माझे एकच सांगणे आहे.
माळी समाजाच्या किती संघटना झाल्या आहे असे म्हणणाऱ्या लोकांना एकच सांगतो आपण गणपती घरा घरात बसवतो राज्यभरात हजारो लाखो गणपती मंडळ असतात पण राज्य पातळीवर लालबागचा राजा ह्या गणपतीलाच ओळखलं जात लाखो भाविक लालबाग राजालाच ओळखतात ना तसंच राज्य पातळीवर महाराष्ट्र माळी समाज महासंघ या अधिकृत संघटनेला ओळखले जाते सर्व राजकीय ,शासकीय, समाजिक, लोक राज्यपातळीवर ह्या महासंघाची दखल घेतली जाते. त्यामुळे माळी समाजाच्या कितीही संघटना राहिल्या तरी जो तो आप आपल्या परीने स्थानिक पातळीवर समाज कार्य करत आहे.पण यांना ही कधी काही अडचण आली किंवा यांच्यावर काही संकट आले तर महाराष्ट्र माळी समाज महासंघच यांच्या पाठीशी उभा राहील त्यामुळे निगेटिव्ह विचार पसरवणाऱ्या लोकांनी आपले विचार बदला मोठे विचार ठेवा आम्ही जोतिबा फुले व सावित्री बाई यांच्या विचारांचा समाज घडवायला निघालो आहे
एक दिवस असा येईल की ग्रामपंचायत पासून ते लोकसभा, विधानसभा पर्यंतचे सर्व निवडणुकीचे तिकीट माळी समाजात ठिकठिकाणी कोणाला द्यायचे हे सर्व राजकीय पक्ष महाराष्ट्र माळी समाज महासंघ कडे विचारणा करतील तो दिवस दूर नाही कारण महाराष्ट्र माळी समाज महासंघाचा प्रत्येक कार्यकर्ता हा प्रामाणिक आहे. मनापासून काम करतो सर्वामध्ये समन्वय आहे.
आपण फक्त लॉकडाऊन उठण्याची वाट बघत आहोत.गाव पातळी पर्यंत आपण पोहचणार आहोत. सर्व माळी समाज बांधवांच्या सुख-दुःखात आपला सहभाग असेल यामुळे आपले समाज कार्य निर्भीड पणे करा कोणाच्या वायफळ बोलण्या कडे लक्ष देऊ नका आपले काम करा मी आपल्या सोबत आहे.
(लेखक महाराष्ट्र माळी समाज महासंघ-प्रदेश अध्यक्ष आहेत) मोबाईल नंबर- ९९६७७१७१७१/ ८७८८९६४०५०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here