बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या बारमालकाचे कामगार महिलेने कापले गुप्तांग

बार्सिलोना (स्पेन) – बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या बारमालकाला एका महिलेने असा धडा शिकवलाय की त्याला आय़ुष्यभर लक्षात राहील. ही घटना स्पेन येथील बार्सिलोनामधील ‘सेंट अँड्रयू डे ला बार्सा’ नावाच्या एका बारमध्ये घडली आहे. बारमालकावर हल्ला करणारी महिला ही त्याच्या बारमध्ये कामाला होती.

बारमालकाने आपल्यावर अनेकदा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असं या महिलेचं म्हणणं आहे. बारमालकाने आपला छळ करून शारीरिक संबंधांसाठी जबरदस्ती केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. बारमालकाने पुन्हा बलात्काराचा प्रयत्न केला तर त्याला दडा शिकवायचा असं महिलेने ठरवलं होतं. काही दिवसांपूर्वी बारमालकाने या महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, यावेळी महिलेने चाकूने त्याचं गुप्तांग कापून टाकलं. यानंतर या महिलेने पोलिसांना फोन केला आणि घडलेला प्रकार सांगितला.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता या महिलेने सांगितलं की बारमालक तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत होता, ज्यामुळे तिला हे कृत्य करावं लागलं. मात्र महिलेच्या हातून गुन्हा घडला असल्याने पोलिसांनी बारमालकासह तिलाही अटक केली आहे. पीडीत महिला ही बांग्लादेशची असून बारमालक हा मूळचा पाकिस्तान किंवा बांगलादेशातील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या घटनेचा अधिकचा तपशीलसखोल चौकशीनंतरच दिला जाऊ शकेल असं पोलिसांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here