श्री छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन महाराष्ट्रात शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा होणार

मुंबई (जिल्हा प्रतिनिधी संतोष कृष्णा जाधव) – श्री छत्रपती शिवाजीमहाराज यांचा ६ जून हा राज्याभिषेक दिन महाराष्ट्रात शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा होत आहे.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राज्यासाठीच नव्हे तर देशासाठी आदर्शदायी व्यक्तिमत्त्व आहे.

जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना या दिवशी प्रत्येकजण अभिवादन करीत असते.राजाचा इतिहास जगातील सर्व राजा पेक्षा बलाढ्य आहे.आणि हा आपल्या राजाचा इतिहास आपल्या देशासहित जगात ही हा इतिहास जतन राहावा यासाठी अनेक इतिहासकार,अभ्यास आणि शिव प्रेरित यासाठीच सतत प्रयत्न करत आहेत.

शिवराज्याभिषेक दिवसा या शुभ दिनी राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे,अभिमत विद्यापीठे,स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, महाविद्यालये,अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतने व तत्सम शैक्षणिक संस्थांमध्ये शिवस्वराज्यदिन म्हणून साजरा.करण्याबाबतचा शासन निर्णय राज्याचे उच्च व तंत् रशिक्षणमंत्री मा.ना.उदयजी सामंत ह्यांनी युवराज श्री छत्रपती संभाजीराजे भोसले याची भेट घेऊन.शिवस्वराज्यदिन म्हणून साजरा करण्यत यावा यासाठी मागणी सुपुर्द केली.राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा.ना.उदयजी सामंत यांनी या दिनाचे औचित्य साधून सर्वांनाी मिळून शिवस्वराज्यदिन हा दिवस सुवर्णमय करावा, अशा भावना वयात केल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here