धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – जळगांव जिल्हा शिवसेना प्रमुख पदी जळगांवचे माजी महापौर विष्णु भाऊ भंगाळे यांची पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशान्वये नियुक्ति करण्यात आली. त्यांच्या या निवड़ी बद्दल धरणगांव शहर शिवसेने तर्फे त्यांचा धरणगांव येथिल शिवसेना कार्यालयात शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटिल, शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांच्या हस्ते शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी विजय महाजन, मोहन महाजन, रविंद्र जाधव, कमलेश बोरसे, नंदू पाटिल, काशीनाथ पाटील, जलगांव महानगर प्रमुख शरद भाऊ तायडे, खुपचंद साहित्या आदि उपस्थित होते.






