महाराष्ट्र राज्य युवा सोनार संघटना मराठवाडा विस्तारकपदी कृष्णा डहाळे यांची निवड

धाराशिव (जिल्हा प्रतिनिधी सुरेश बागडे) – महाराष्ट्र राज्य युवा सोनार संघटना कार्यकारणी जाहीर झाली असून मराठवाडा विस्तारकपदी कृष्णा डहाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.



महाराष्ट्र राज्य युवा सोनार संघटनाचे संस्थापक अध्यक्ष आदित्य दहिवाळ म.उपाध्यक्ष शुभम दहिवाळ कार्याध्यक्ष अविनाश उडानशिव,महाराष्ट्र राज्य सचिव अजय जढे ,म.राज्य सचिव रोहित महादने, म.राज्य सचिव हेमंत सराफ ,प्रदेश विस्तारप्रमुख नितीनजी आहिरराव,महिला प्रदेशध्यक्षा रिना सोनार ,महिला प्रदेश उपाध्यक्ष ज्योती दहिवाडकर महिला प्रदेश सचिव शितल विखनकर यांचे नेतृत्वाखाली धाराशिव जिल्हा अध्यक्ष कृष्णा डहाळे, यांची मराठवाडा विस्तारकपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

कृष्णा डहाळे यांची कार्यकुशलता बघुन संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकारी यांनी त्यांची पदोन्नती धाराशिव जिल्हा अध्यक्ष वरून मराठवाडा विस्तारकपदी निवड केली आहे. संघटनेत काम केल्यानंतर त्यांची कदर केली जाते या निमीत्ताने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवुन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here