दहिसरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – दहिसर प्रभाग क्रमांक ७ मधील लिंक रोडवरील भक्ती पॅलेस या इमारतीच्या एका घराच्या हॉलचा स्लॅब आज पहाटे खालच्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशाचा घरात कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या धोकादायक असलेल्या इमारतीतील 19 नागरिकांना इतरत्र स्थलांतरित करण्यात आले आहे.

इमारतीचे पाणी आणि वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच शिवसेना विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस यांच्यासह भक्ती पॅलेस येथे भेट दिली, अशी माहिती त्यांनी दिली. तर सदर झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यात येत आहे. परिमंडळ ७ चे उपायुक्त विश्वास शंकरवार तसेच इतर पक्षांचे लोकप्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here