चोपडा (प्रतिनिधी मिलिंद वाणी) – तालुक्यातील वडती येथील अमर संस्था संचलित, पूज्य साने गुरुजी माध्यमिक विद्यालय वडती या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय टेली कोल्याबोरेशन प्रोजेक्ट अंतर्गत सहभाग घेऊन बांगलादेशच्या इंग्रजी विषयाच्या शिक्षिका खादीमा नसरिन यांच्याशी आणि तेथील विद्यार्थ्यांशी झूम मीटिंग च्या माध्यमातून इयत्ता नववी आणि दहावीचे विद्यार्थी यश धनगर आणि रियाज तडवी या विद्यार्थ्यांनी त्यांना बांगलादेशात असलेल्या शैक्षणिक धोरण, तेथील असलेली शिक्षण पद्धती, त्याचबरोबर तेथील संस्कृती, सण- उत्सव याबाबत त्यांच्याशी संवाद साधून माहिती जाणून घेतली.
खादीमा नसरीन यांनी देखील वडती शाळेच्या विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न विचारून आपल्याला पुढे काय बनायचे आहे? यावर रियाज तडवी यांने कलेक्टर आणि यश धनगर याने आय ए एस अधिकारी बनायचे आहे अशा अनेक प्रश्नांना उत्तरे देऊन विस्तृत संवाद साधला. या प्रोजेक्टमध्ये भारत-बांगलादेश च्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पात सहभागी होण्यासाठी वडती शाळेचे शिक्षक जगदीश पाठक यांनी त्यांना या प्रकल्पात समाविष्ट करून मार्गदर्शन केले.
श्री पाठक यांनी या आंतरराष्ट्रीय प्रकल्पात सहभाग घेऊन यशस्वी रित्या पूर्ण केले म्हणून त्यांना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सदरच्या संवादात नाशिक जिल्ह्याचे डायटचे अधिव्याख्याता योगेश सोनवणे तसेच जळगाव जिल्ह्याचे इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भरत शिरसाट तसेच पहूर हायस्कूलचे शिक्षक शंकर भामरे आणि त्यांची विद्यार्थीनी आकांक्षा जाधव देखील सहभागी होते. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय टेले कोल्याबरेशन प्रकल्पामुळे शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.समाजातील सर्व स्तरातून या प्रकल्पाचे कौतुक होत आहे.






