पुणे (कार्यकारी संपादक निलेश बटाणे) – येथील सर्व कलाकारांच्या संस्था येणार एका छताखाली ” प्रसार माध्यमा करिता जारी …. कोरोनाच्या धर्तीवर पुण्यातील लावणी , लोकधारा , ऑर्केस्ट्रा , नाटय – चित्रपट ,एकपात्री , नृत्य , साउंड – इलेक्ट्रिकल जनरेटर असोसिएशन पुणे तील सर्व संस्था प्रमुखांची फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून महत्वाची बैठक पार पडली , कोरोनाच्या काळात कलाकारांनी बिकट परिस्थितीतीशी सामना सामर्थ्याने करत असताना या संकटातवर कस मात करू शकतो यावर सखोल चर्चा झाली , लवकरच शहरातील नाट्य गृह -थिएटर सुरू करावेत ही आग्रही मागणी करण्यात आली आहे , साउंड च्या उद्योगांना मोठा फटका बसला असून त्यातून गणपती मिरवणुका रद्द झाल्याच्या पाश्वभूमीवर मंडपातील साउंड 10 दिवस लावण्याची परवानगी द्यावी अशी प्रामुख्याने मागणी करण्यात आली , गणपती उत्सवात कलाकारांनी सुरक्षतेचे काळजी घ्यावून कार्यक्रम सादर करावेत , 200 लोकांच्या सुरक्षतेची काळजी घेऊन थिएटर उपलब्ध करून दयावे 1 तारखेपर्यंत नाट्यगृह सुरू न झाल्यास मुखमंत्री मा.उद्धव ठाकरे , पालकमंत्री अजितदादा पवार , महापौर मुरलीधर मोहोळ यांची भेट घेणार असल्याचे सांगितले ,या प्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराजराजे भोसले , संवाद पुणे चे सुनीलजी महाजन , इंम्पा चे माणिकभाई बजाज , साउंड इलेक्टिकल जनरेटर असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमजानी , उपाध्यक्ष शैलेश गायकवाड , गायक जितेंद्र भुरूक , गायक विवेक पंड्या , गायक – मकरंद पाटणकर , पंचम चे आनंद घोगरे , आम्ही एकपात्री चे राजेश शिंगाडे , गायक प्रशांत साळवी , महा अँकर्स असोसिएशनचे योगेश सुपेकर नागन्ना झलकी ,रियाझ शेख उपस्थित होते प्रसिद्ध निवेदक संदीप पाटील यांनी आयोजन केले.








