पुणे (बाजीराव नाईक) – आज (दि.२८) बहुजन परीवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजिचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव सदाशिव नाईक यांच्या नेतृत्वाखाली, राशीताई सखाराम मोहिते यांची सोलापूर महिला अध्यक्ष बिनविरोध निवड करण्यात आली
राशीताई मोहिते या पंढरपूरच्या असून, सदानंद महाराज बेलदार समाज ट्रस्ट पंढरपूर येथे कार्यरत आहेत. पंढरपूर तीर्थक्षेत्र या ठिकाणी वारकरी संप्रदाय गोर गरिबांना व गरजूसाठी राहण्यासाठी मदत करतात. तसेच वारकरी संप्रदायाची जेवण व राहण्याची सोय करतात. मानवता हाच धर्म खरा, समभाव धर्म सामाजिक काम करण्याची त्यांना आवड आहे. जिजाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून मुंबईसह अनेक जिल्ह्यांतील महिलांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरची लढाई केली आहे पंढरपूर येथे लॉक डाऊन मध्ये अनेक गोरगरीब जनतेसाठी अन्न धान्य मोठ्या प्रमाणात वाटप केले.
त्यांच्या या समाजकार्याचा आवाका पाहून बहुजन परीवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजिचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव सदाशिव नाईक यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवड करण्यात आली.. या निवडीबद्दल राशीताई सखाराम मोहिते यांचे बहुजन परीवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजिचे महाराष्ट्र राज्य सचिव राजेंद्र सोनवणे, महाराष्ट्र राज्य कार्य अध्यक्षा सौ. तेजस्वी गणेश कवळे यांनी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
Home Uncategorized बहुजन परीवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीच्या सोलापूर महिलाध्यक्षपदी राशीताई...







