मुंबईतील वांद्रे परिसरात इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुंबईतील वांद्रे परिसरात एका इमारतीचा भाग कोसळला आहे. यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले आहे. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे परिसरात बेहराम पाडा परिसरात चार मजली रझाक चाळ आहे. काल (रविवारी 6 जून) रात्री 2 च्या सुमारास या 4 मजली इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. सध्या जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

सद्यस्थितीत घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. या ठिकाणी सध्या अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक पोलीस उपस्थित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here