धरणगावात सकल मराठा समाजातर्फे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा…

धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – रविवार दि.6 जून रोजी धरणगावात सकल मराठा समाजाकडून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत,बहुजन प्रतिपालक, कुळवाडीभूषण, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक निमित्त महाराजांचा पुतळ्याला धरणगाव नगरीचे प्रथम नागरिक निलेश भाऊ चौधरी आणि पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांचा हस्ते पुष्पअर्पण करण्यात आले.

६ जून १६७४…….गुलामगिरीच्या मुक्ततेची नवी पहाट……इथल्या भुमिपुञाचा,कष्टकरी जनसमुदायाचा,शोषितांचा, वंचितांचा,शेतकऱ्यांचा, अठरापगड जातसमुहाचा प्रतिनिधी……..इथल्या वर्णवर्चस्ववादी धर्मव्यवस्थेची, शोषणवादी समाजव्यवस्थेची शतकानुशतकांची बंधने झुगारून सार्वभौम छञपती झाला तो दिवस…. अर्थात “शिवराज्याभिषेक दिन”….. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता शिवराय मनामनात शिवराज्याभिषेक घराघरात या वाक्याला अनुसरून हा शिवस्वराज दिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

shivrahyabhishek

याप्रसंगी गुलाब भाऊ मराठे, चंदन पाटील,भीमराज पाटील, मंगेश पाटील, वाल्मिक पाटील, योगेश पी.पाटील, बंटी दादा पवार, राहुल मराठे, राजू भाऊ महाजन, ॲड.संदीप पाटील, मोहन पाटील, सचिन पाटील, ललित बोरसे पाटील तसेच गावातील शिवभक्त आणि मराठा बांधव उपस्थित होते.

shivrajyabhishek-at-dharangaon

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here