ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – रविवार 6 जून 2021 रोजी अविशयात ट्रस्ट आणि भाजपा चित्रपट कामगार आघाडी ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि चित्रपट कामगार आघाडी चे प्रदेश अध्यक्ष विजय सरोज व सत्यवानदादा गावडे, ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष सौ सुषमाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने गरजू चित्रपट कलाकार आणि कामगारांना धान्य किट वाटप् करण्यात आले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय रणदिवे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे नेतृत्व आणि मोलाचा सहभाग जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार, उल्हास तावडे, प्रदेश सचिव ठाणे सहप्रभारी सौ नताशा सोनकर, महिला शहर अध्यक्ष, संतोष तेली जिल्हा सरचिटणीस , सुनील साठे मिडिया हेड, कौशिक पाटील शहर सरचिटणीस, दालूसिंगजी जिल्हा उपाध्यक्ष यांनी केले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मिलींद बागुल अध्यक्ष अविशयात ट्रस्ट, संतसंग सेवा ट्रस्टचे रामजीभाई कोळी हे होते. या कार्यक्रमात ठाणे आमदार संजय केळकर यांनी आवर्जून उपस्थित राहून उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. सतीश बनसोडे अध्यक्ष पोलीस बॉईज असोसिएशन, रविंद्र महाडीक प्रदेश सचिव यांची ही उपस्थिती होती तसेच राधा शर्मा जिल्हा सरचिटणीस , राहूल वनारे, राणी कोरी, निशा मॅडम उपस्थित होते. जिल्हा आणि शहर कार्यकारिणीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांचे आभार मानले.







