धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – मुंबई येथून शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या आदेशानुसार, उत्तर महाराष्ट्र संम्पर्क नेते खा. संजय राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच शिवसेना सचिव खा. अनिल देसाई, समन्वयक रविन्द्र मिर्लेकर, जळगांव जिल्हा संम्पर्क प्रमुख संजय सावंत यांच्या सूचनेनुसार, जळगांव लोकसभा सहसंपर्क प्रमुख म्हणून गुलाबराव वाघ यांची नुकतीच बढतीचा पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यानिमित्त धरणगांव येथे घरी जाऊन गुलाबराव वाघ यांच्या शिवसेना नगरसेवक भागवत चौधरी व विलास महाजन यांनी सत्कार केला.
या सत्कार कार्यक्रम प्रसंगी शिवसेना नगरसेवक व लहान माळी वाडा मित्र परिवार जेष्ठ शिवसैनिक, गोपाल चौधरी, शिवसेना उपशहर प्रमुख किशोर पाटील,शाखा प्रमुख मराठे गल्ली नाना मराठे, यशवंत नागरी पतसंस्थेचे पिग्मी एंजठ सुधाकर महाजन, भगवान महाजन, गोरख महाजन, अण्णा महाजन, सोनु पाटील, साई भोजनालयाचे संचालक दिपेश सोनार – दिपक महाजन, हर्षल महाजन, भावेश चौधरी, नानु महाजन, निलेश महाजन, प्रशांत महाजन, विक्की महाजन तसेच असख्य शिवसैनिक व मित्र परिवार उपस्थित होते उपस्थित होते.

याप्रसंगी नगरसेवक भागवत चौधरी तसेच विलास महाजन यांनी पुढील काळात जास्तीत जास्त संघटना मजबूत करण्यासाठी सहकार्य व मदत करु असे आश्वासन देवुन मनोगत व्यक्त केले.







