वरळी येथील स्रावस्ती बुध्द विहारात मोफत मास्क वाटप

मुंबई (उपसंपादक सुनिल तांबुसकर) – दि बुध्दिस्ट सोशियल फाऊंडेशन आणि महामाता भिमाई रामाजी आंबेडकर स्मारक साकेडी अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे थोरले बंधू कालकथित बाळाराम रामजी आंबेडकर यांची कन्या सखुबाई भागुराम तांबुसकर यांचा चिरंजीव कालकथित गंगाधर भागुराम तांबुसकर यांचा सुपूत्र सुनील गंगाधर तांबुसकर म्हणजे! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू यांनी वरळी येथील स्रावस्ती बुध्द विहारात रविवारी दि. ६ जून रोजी दिप प्रज्वलन त्रीशरण पंचशील घेऊन उपस्थित बंधू आणि भगिनींना मोफत मास्क वाटप केले.

बुध्द विहाराचे अध्यक्ष यशवंत जाधव कार्यकरते यांनी परिचय देऊन स्वागत केले. तसेच, कार्यक्रमात सहभागी संजय जाधव हे चित्रपट दिग्दर्शक निर्माते नालासोपारा यांनी मार्गदर्शन केले. तसेच, शिवाजी पार्क येथे वृक्षारोपण सुनील तांबुसकर आणि श्री.पाटकर, संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

sunil-tambuskar

अंधेरी येथील त्यांच्या घरी ज्ञानज्योती भंन्तेजी नागपूर यांची भेट घेतली. तेंव्हा त्यांनी मार्गदर्शन केले. याठिकाणी उपस्थित बहुजन पार्टीचे अध्यक्ष श्री.खैरे व त्यांचे सहकारी श्री.खंदारे आणि महिला उपस्थित होते.

sunil-tambuskar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here