जि.प.सदस्य गोपाल बापू चौधरी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – पिंप्री सोनवद जी.प गट जळगांव जिल्हाचे सदस्य श्री गोपाल बापू चौधरी यांचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने त्यांच्या फार्म हाउस वर साजरा करण्यात आला. त्यांचा वाढदिवसानिमित्त पालकमंत्री मां.ना.गुलाबरावजी पाटिल यांनी त्यांचा शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार केला.

याप्रसंगी शिवसेना उप जिल्हा प्रमुख पी.एम.पाटील सर, संजय निराधार समिती चे नाना भालेराव,अंजनविहीरयाचे रवि चव्हाण सर ,धरणगांव उपशहर प्रमुख रविंद्र जाधव, युवा सेनेचे कमलेश बोरसे,नवल पाटील,बाळू सपकाळे,बाळू ननावरे,पिंप्री गटाचे कार्यकरते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here