महाराष्ट्राची शान आमचे गुलाबरावजी पाटील गाणे झाले प्रदर्शित…

धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजस एंटरटेनमेंट व ड्रीम ऑडिओ वर्क स्टेशन जळगाव प्रस्तुत “महाराष्ट्राची शान आमचे गुलाबरावजी पाटील” हे गाणे आज महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव ना.गुलाबराव टील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना जळगाव महानगर प्रमुख शरद तायडे, राजस ग्राफिक्सचे संचालक निलेश पाटील यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले.

या गाण्याची निर्मिती धरणगाव येथील प्रसिद्ध चारुदत्त राजेंद्र पाटील (डी.जे. गोलू ) याने केली असून गीतकार व नाशिक येथील प्रसिद्ध कर मन्ह लगन फेम भैय्यासाहेब मोरे यांनी गायन केले आहे संगीत जळगाव येथील जितू गायकवाड यांनी दिले आहे तसेच रेकॉर्डिंग ड्रीम ऑडिओ वर्क स्टेशन येथील प्रमोद महाजन व लखन हिरे यांनी केले आहे.

या गाण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, विक्रम गुलाबरावजी पाटील, डायरेक्टर प्रदीप भोई जळगांव, श्री गुलाबरावजी पाटील फाऊंडेशन जळगाव/पाळधी व सर्व शिवसैनिक यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे हे गाणे डी.जे. गोलू यांच्या Rajas Entertainment या यूट्यूब चॅनल वर प्रदर्शित करण्यात आले आहे तरी सर्व ना.गुलाबराव पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील नागरिकांनी गाणे नक्की गाणे ऐकावे असे पूर्ण टीमने आवाहन केले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here