इंधन दरवाढीविरोधात इचलकरंजी येथे काँग्रेसचे आंदोलन

कोल्हापूर (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक मनोज सोनवले) – महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. नाना पटोले जी सुचनेनुसार केंद्र सरकारने वाढवलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढी विरोधात इचलकरंजी शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने पेट्रोल पंपावर जोरदार निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. देशातील अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर प्रति लिटर 100 रूपये, डिझेलचे दर प्रति लिटर 92 रूपये व एल.पी.जी. गॅस चे दर 850 रूपये झालेने देशातील सर्वसामान्य माणसांचा खिसा कापून भांडवलदार मित्रांचे हित साधण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकार कडून होत असल्याची टिका नगरसेवक शशांक बावचकर यांनी केली.

केंद्रातील भाजप सरकारने वाढवलेले दर कमी नाही केले तर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष मा. नाना पटोले जी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष मा. संजय कांबळे यांनी सांगितले.

congress-andolan-at-ichalkaranji ichalkaranji-congress
यावेळी शहर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष बाबासाहेब कोतवाल, अजित मिणेकर, राजु आवळे, राजण मुठाणे, हारूण खलिफा, ताजुद्दिन खतिफ, सतिश कांबळे, प्रमोद नेजे, प्रथमेश देसाई, योगेश पंजवानी, संग्राम घुले, योगेश कांबळे, प्रशांत लोले, आलम मोमीन, अनिल कदम, रियाज जमादार, प्रविण फगरे, रोहित कदम, रोहित दाहोत्री, समीर शिरगावे, दशरथ जाधव, हरिष शेरीगार, बाळासो मुजावर, अनिल कोळी, रवी वासुदेव, शौकत मुल्ला, आसिफ राजण्णावर, अनिल पाटील, अफताफ खलिफा, ताहिर खलिफा, हरिदास तिप्पे, प्रकाश कांबळे, अक्षय कांबळे, सुशांत कोळी, शहर महिला अध्यक्षा सौ. मिनाताई बेडगे , माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. प्रमिलाताई पाटील व कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here