भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे रक्तदान शिबिर संपन्न

भुसावळ (गिरीश पवार) – शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम वरणगाव येथील प्रभाग क्रमांक 10 मधील अभ्यासिकेत नामदार गुलाबराव पाटील यांच्या आदेशाने तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला
याप्रसंगी रेडक्रॉस सोसायटी जळगावला संकलित केलेले रक्त देण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी भुसावळ तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख समाधान महाजन उपजिल्हा संघटक विलास मुळे विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे तालुका संघटक धीरज पाटील उपतालुकाप्रमुख सुभाष चौधरी हिरामण पाटील समाधान पाटील सुभाष पाटील उपतालुका संघटक प्रकाश कोळी ज्येष्ठ शिवसैनिक सुनील कोळी सुरेश चौधरी निळकंठ सरोदे यांच्यासह निलेश सुरडकर ठाकूर अतुल पाटील कैलास पाटील पंकज पाटील राहुल बावणे रोहित मुळे सागर वंजारी विपुल बंगाळे मयूर चौधरी दीपक पाटील सागर लोंढे सागर वाघ दीपक पाटील शिवा भोई गोली भोई विनोद महाजन वसंत नेहते सर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले
प्रसंगी रक्तदान शिबिर स्थळी वरणगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.गोसावी, वरणगावातील गणपती हॉस्पिटलचे डॉ. पी व्ही पाटील, डॉ.वसीम शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिपक मराठे, शहराध्यक्ष संतोष माळी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, युवक काँग्रेसचे ज्ञानेश्वर पाटील, सुदर्शन जाधव, राजूभाऊ पालीमकर, शिवसेनेचे दिपक धांडे, ॲड. श्री लोखंडे, दिव्यांग सेवक देविदास चौधरी, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आकाश कुरकुरे यांनी भेटी देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here