अलिबागला ही संकल्प संस्थेचा कोरोना विरुद्ध लढा

मुंबई (प्राजक्ता अरूण चव्हाण) – कोरोना कोविड – १९ वैश्विक महामारी तसेच निसर्ग चक्रीवादळ या दुहेरी आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या व बेरोजगारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रुपग्रामपंचायत बोरघर हद्दीतील “गंगेची वाडी” या आदिवासी वाडीत संकल्प संस्थेच्या माध्यमातून ‘कोरोना विरुद्ध लढा’ मदतीचा हात पुढे करत वाडीमधील सर्व आदिवासी ६० कुटुंबांना राशन किट, कोलगेट, फेसमास्क, सॅनिटरी पॅड अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप प्रत्यक्ष त्याठिकाणी वाडीला जावून संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे, संकल्प संस्थेचे सहकारी सदस्य विक्रम हिवाळे, राहुल कटारे, अमोल हिवाळे, मनीष हिवाळे यांनी स्वतः उपस्थित राहून केले. तसेच बोरघर ग्रुपग्रामपंचायतचे माजी सरपंच मधुकर ढेबे, माजी सरपंच पुष्पा लेंडी, जिल्हापरिषद सदस्य मधु पारधी, ग्रामपंचायत सदस्य नारायण पिंगळे, पुरोगामी युवक संघटना, अलिबाग सदस्य उत्तम रसाळ यांची ही हजेरी लागली.
गंगेची वाडी या ठिकाणी हातावर पोट असणाऱ्या आदिवासी बंधू – भगिनींना लॉकडाऊनमुळे बेरोजगारी व उपासमारीचा सामना करावा लागत असताना, संकल्प संस्थेने केलेल्या मदतीमुळे तेथील सर्वांनाच गहिवरून आले. सदर वाटपानंतर अध्यक्ष हिवाळे यांनी उपस्थितीतांस कोरोना बचावात्मक उपाययोजना, सोशल डिस्टनसींग व स्वयंम सुरक्षा यावर मार्गदर्शनात्मक माहिती देत उपस्थित लाभार्थी व मान्यवरांचे आभार ही व्यक्त केले. तसेच सदर कार्याचे स्थानिक पातळीवर सुयोग्य नियोजन केल्याबद्दल उत्तम रसाळ तसेच संकल्प संस्थेने सदर मदत करावी असे आव्हान केल्याबद्दल प्रवीण रा. रसाळ यांचे विशेष आभार व्यक्त केले. या कार्यास विशेष सहकार्य रिनव्हेत इंडिया, मनपसंत लाईफ, सावित्रीबाई फुले महिला मंडळ, आदर्श फाऊंडेशन, सुषमा हिवाळे, पल्लवी सुर्वे, स्नेहाताई भालेराव, मधुकर कदम, चंद्रकांत मोहिते, जॉयस राबिनसण, प्रतिभा खरात, गाजला आझाद, मालवींन पणग्या, अर्चना जगताप, अक्षरा माने, अनिता, प्रेमा महाडिक आणि बबिता सपकाळ या सर्वांचे लाभले. तसेच यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here