मुंबई (प्रमिला जाधव) – कोरोनाच्या कठीण प्र संगात लॉकडाऊन असल्याने अनेक मजूर, कामगार आणि गरजू नागरिकांना अन्नधान्य आणि जेवण वाटप करून त्यांना केतन खेडेकर समाजसेवक, कामगार नेते निशिकांत शिंदे यांनी आधार दिला होता. त्यांच्या या कामाची दखल घेऊन केंद्र सरकारच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिझीकल हेल्थ सायन्स या संस्थेने त्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान केला. आम्ही नेहमी लोकांची सेवा करण्यासाठी कटिबद्ध असतो. या कोरोनाच्या कठीण परिस्थितीत लोकांचे जगणे फार कठीण झाले असून अनेक लोकांचे रोजगार बुडाले आहेत त्यामुळे त्यांचावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आम्ही अनेक नागरिकांना आणि लोकांना रेशन आणि अन्नधान्य पुरवलं असून यापुढेही आम्ही अशीच मदत करत राहणार आहोत. या सामाजिक कामात माझ्या सोबत माझ्या टीमने मला फार मदत केली असल्याची माहिती कामगार नेते, समाजसेवक निशिकांत शिंदे यांनी दिली.







