मुंबई (उपसंपादक सुनिल तांबुसकर) – दि. “बुध्दिस्ट सोशियल फाऊंडेशन आणि महामाता “भिमाई रामाजी आंबेडकर स्मारक साकेडी अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे थोरले बंधू कालकथित बाळाराम आंबेडकर यांची कन्या सखुबाई भागुराम तांबुसकर यांचा चिरंजीव कालकथित गंगाधर भागुराम तांबुसकर यांचा सुपूत्र सुनील गंगाधर तांबुसकर म्हणजे! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू यांनी सहर्ष सेवा मंडळ बुध्द विहार घोडपदेव या ठिकाणी भेट दिली.
यावेळी त्यांनी दिनांक २८/मे/२०२१ रोजी कोरोना महामारीच्या काळात संरक्षण व्हावे यासाठी मास्क वाटप केले. संयोजक आद. “शांताराम खंदारे ( इन्कम टॅक्स) “संजय जाधव (चित्रपट दिग्दर्शक निर्माते)सहर्ष सेवा मंडळ घोडपदेव कार्यकर्ते ‘अध्यक्ष “विजय साळवी अशोक पवार, गणपत हिवाळे कर, सुगंध संतोष, बरोबर सहकारी यांनी आभार मानले. ‘जयभिम जयभिमाई “संदेश सावळाराम जाधव (साकेडीकर) यांनी केले.







