धरणगाव येथे जळगांव लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांचा सत्कार

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, उत्तर महाराष्ट्र संम्पर्क नेते खा. संजय राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच शिवसेना सचिव खा. अनिल देसाई, उपनेते तथा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, समन्वयक रविन्द्र मिर्लेकर, जळगांव जिल्हा संम्पर्क प्रमुख संजय सावंत यांच्या सूचनेनुसार, जळगांव लोकसभा सहसंपर्क प्रमुख म्हणून गुलाबरावजी वाघ यांची नुकतीच बढतीच्या पदावर नियुक्ती करण्यात आली.

त्यांच्या या नियुक्तीबद्दल धरणगांव येथे गुलाबराव वाघ यांचा गंगापुरीतर्फे साई पॅथालॉजीचे संचालक तथा संरपच महेश पाटील तसेच साई कलेक्शनचे प्रोप्रायटर नितीन पाटील गंगापुरीकर यांनी सत्कार केला. यावेळी गंगापुरी ग्रामस्थांच्यावतीने महेश पाटील व नितीन पाटील यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here