वाघोली येथे नवीन पोलीस ठाणे करण्याची शिरूर हवेलीच्या आमदार अशोक पवार यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना शिरूर हवेलीच्या आमदार अशोक पवार यांनी निवेदन देऊन वाघोली साठी नवीन पोलीस ठाणे तर उरुळी कांचन हे पुणे ग्रामीण अंतर्गत ठेवणेबाबतची मागणी केली.

लोणीकंद ता.हवेली जि.पुणे येथील पोलीस स्टेशनची हद्द पुणे पोलीस आयुक्त कार्यालयांतर्गत समाविष्ट करण्यात आलेली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन अंतर्गत वाघोली हे सर्वात मोठे गाव असल्याने येथील पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असल्याने वाघोली येथे नवीन पोलीस स्टेशन कार्यान्वित करण्याबाबत तसेच उरुळी कांचन ता.हवेली या पोलिस स्टेशन अंतर्गत ग्रामीण भागातील लहान गावे समाविष्ट असल्याने हे पोलिस स्टेशन पुणे ग्रामीण अंतर्गत ठेवणेबाबत शासन निर्णय घेऊन कार्यान्वित करण्याबाबत मागणी करण्यात आली असल्याची माहिती शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी दिली आहे.

वाघोली साठी नवीन पोलीस ठाणे व्हावे यासाठी ग्रामस्थांच्या वतीने खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूर हवेली चे आमदार अशोक पवार, यांचे कडे पाठपुरावा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here