शासकीय कोविड सेंटरला रिपाइं आणि एन.डी.एम.जे च्या पदाधिकारी यांची भेट

माळशिरस (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – शासकीय कोविड सेंटर महाळुंग ता.माळशिरस येथे भेट देऊन सेंटरमध्ये असलेल्या सोयी-सुविधांची माहिती घेतली.

अनेक रुग्णांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून कोरोना बाधित रुग्णांना सर्व सेवा पुरवण्यात येतील अशी चर्चा झाली. रुग्णांशी चर्चा करून रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या. संपूर्ण कोविड सेंटर पाहिले. गोरगरिबांना शासकीय सरकारी रुग्णाल्याशिवाय पर्याय नसतो त्यामुळे कार्यकर्त्यांनी वेळोवेळी येथे भेटी देऊन विचारपूस करावी अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.

यावेळी रिपाइंचे नेते राजाभाऊ सुरवसे,समाधान लांडगे,नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे पश्चिम महाराष्ट्र सचिव बाबासाहेब सोनवणे तालुक्याचे नेते बाबासाहेब सोनवणे, प्रणव भागवत, प्रबुद्ध गायकवाड उपस्थित होते. संघटनेच्या वतीने सर्व समस्या सोडवल्या जातील असे आश्वासन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here