पवईतील हॉटेल व्यवसायिकाने दाखल केलेला गुन्हा खोटा असल्याचे गुन्हे कक्षा १० पोलिसांकडून उघड

मुंबई (विशेष प्रतिनिधी संजय शेकोकार) – नोकरांचा पगार न देण्यासाठी पवईतील हॉटेल व्यवसायिकाने अपहरण व जबरी चोरीचा दोन वर्षापुर्वी दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा कक्षा-१० गुन्हे प्रकटीकरण शाखेने उघडकीस आणला आहे.

गुन्हा कक्षा-१० गुन्हे प्रकटीकरण शाखेत याबाबत कक्ष-१०, गुपशा, गुअवि., मुंबई. पोलीस ठाणे पवई पोलीस ठाणे, मुंबई गु.र.क. व कलम गु.र.क्र. ७१०/२०१९, कलम ३६३, ३२८, ३९२, ३४ भादंविसं. दाखल दिनांक २९/११/२०१९ रोजी ०२.३५ वा. दाखल करण्यात आला होता.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी किर्तेश योगेंदर पिपलानी, वय ४३ वर्षे यांचे चिप्सी चॉप्सी, चांदीवली व पराठा. पवई या नावाचे दोन हॉटेल आहेत. दिनांक २८/११/२०१९ रोजी त्याच हॉटेलमध्ये काम करणा-या नोकरांचा पगार देण्याकरीता त्यांचेजवळ असलेल्या ६०,000/- रूपये घेवून अजुन पैसे काढण्यासाठी ते पवई येथील बॅक ऑफ बडोदा येथील एटीएम सेंटर जात होते. त्यावेळी पवई येथील स्वामीनारायण चौकाकडून सिल्वर रंगाची मारूती इको कार त्यांचेजवळ थांबली.

या कारमधील एका इसमाने त्यांना पत्ता विचारला, त्याचवेळी इको कार मधील दुस-या इसमांने त्यांचा नाकांवर रूमाल ठेवला. काही वेळान त्यांना जाग आली तेव्हा ते आरे यथील रस्त्याच्या कडेला पडलेले होते. त्यावेळी त्यांना त्यचिकडील ६०,०००/रोख रक्कम, नोकीया व ब्लॅकबेरी कंपनीचा मोबाईल व बँक ऑफ इंडियाचे ओटीएम कार्ड मिळून आले नाही. म्हणून सदरबाबत त्यांना गुंगीकारक औषध देवून त्यांचे अपहरण करून त्यांचेकडील रोख रक्कम व मोबाईल जबरी चोरी झाल्याचा त्यांनी वरीलप्रमाणे पवई पोलीस ठाणेस गुन्हा दाखल केला.

सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हा दाखल झालेपासून कक्ष १०, गुन्हे शाखेकडून समातंर तपास चालू होता. फिर्यादी याने दिलेल्या तक्रारीबाबत कक्ष १० चे पथकांस संशय निर्माण झाला. त्यानंतर कक्ष १० च्या पथकाने केलेल्या तांत्रिक तपासांच्या आधारे व फिर्यादी यांचेकडे केलेल्या कौशल्यपुर्वक चौकशीअंती फिर्यादीनेच हॉटेलमध्ये काम करणा-या नोकरांचा पगार न देण्यासाठी अपहरण व जबरी चोरी झाल्याचा बनाव करून पवई पोलीस ठाणेस खोटा गुन्हा दाखल केल्याचे उघड झाले.

वरील नमूद गुन्हयात जबरी चोरी झालेले दोन मोबाईल फोन हे फिर्यादीकडून हस्तगत करण्यात आले असून नमूद फिर्यादीस गुन्हयातील जप्त मोबाईलसह पुढील कारवाईसाठी पवई पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हयातील हस्तगत मालमत्ता :१) एक काळया रंगाचा नोकीया ६ मॉडेल कंपनीचा मोबाईल त्यामध्ये व्होडाफोन कंपनीचे सिमकार्ड २ एक काळया रंगाचा ब्लॅकबेरी कंपनीचा एसटीव्ही १००-३ मॉडेल असलेला मोबाईल फोन करण्यात आले.

ही यशस्वी कारवाई पोलीस सह आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त | (गुन्हे) एस. विरेश प्रभू, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) गुन्हे शाखा, अकबर पठाण, सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पश्चिम) गुन्हे शाखा सिध्दार्थ शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली, कक्ष-१० गुप्रशा, मरोळ मुंबई येथील प्रभारी पोलीस निरीक्षक महेशकुमार ठाकूर, पोलीस निरीक्षक किरण लोंढे, सहा. पोलीस निरीक्षक विजय सांडभोर, धनराज चौधरी, गणेश तोडकर आणि पोलीस अंमलदार अजित पाटील, रमेश नलावडे, अविनाश चिकणे आणि पवन शिंदे यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here