रितेश-जेनेलियाचा मजेशिर व्हिडीओ झाला सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडीओ

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – चित्रपटसृष्टीतील अभिनेता रितेश देशमुखनं त्याच्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली आहे. आज रितेशचे जगभरात चाहते आहेत. रितेश सोशल मीडियावर सक्रिय असलेला पहायला मिळत असतो. तो नेहमी वेगवेगळे व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असतो. आता रितेशचा आणि जेनेलियाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश आणि जेनेलिया असल्याचं दिसत आहे. तर व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला ‘पुट यॉर हॅन्ड्स ऑन माय शोल्डर’ हे गाणं सुरु आहे. जेनेलिया उठल्यानंतर रितेशच्या लक्षात येतं की जेनेलिया तर इथे नाही मग हा हात कोणाचा तर तो हात दिग्दर्शक मिलाप झवेरीचा असतो. मिलाप त्या दोघांच्या मागे लपलेला होता. त्यांचा हा विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

रितेशने शेअर केल्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. या व्हिडीओला 18 हजारापेक्षा जास्त लोकांनी पाहिले असून अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, बॉलीवूडमध्ये काही लग्न झालेल्या जोड्याही चर्चेत असतात. त्यापैकीच एक जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुजा. त्यांच्या लग्नाला 9 वर्षे झाली असून दोघेही खूप आनंदी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here