उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..भा.ज.पा. तानाजी पोवार यांचे आदेश
कोल्हापूर (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक मनोज सोनवले) – इचलकरंजी शहरात प्रत्येक प्रभागांनुसार घंटागाडीच्या माध्यमातून “आदर्श फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्विस” या कंपणीद्वारे कचरा उठावाचे काम सुरू आहे. सदर कामाबद्दल बहुतांश पदाधिकारी, नगरसेवक, नगसेविकांच्या विविध प्रकारच्या तक्रारी येत असल्याने काल (दि.१० जून) उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी मुख्याधिकारी.इ.न.पा. डॉ. प्रदीप ठेंगल आणि पदाधिकारी, नगरसेवक यांच्या समवेत सदर कंपनीचे प्रतिनिधी,आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कंपनीचे सुपर वायझर यांची आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी पदाधिकारी आणि नगरसेवक यांनी या कामा बद्दल अनेक तक्रारी उपस्थित केल्या. याप्रश्नी मुख्याधिकारी डॉ.प्रदीप ठेंगल यांनी करारानुसार काम करणेच्या सुचना दिल्या. यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक घरातून कचरा उचलणे..पॉईंट वरून कचरा उचलणे..इत्यादी बाबींचा समावेश आहे. याचबरोबर नगरपरिषद आरोग्य विभागाकडील यंत्रणेचा पुरेपूर वापर करावा व कचरा डेपोवर वाहतुकीची सुविधा करणेचे आदेश दिले.त्याचबरोबर जे नागरिक घंटागाडीमध्ये कचरा न टाकता रस्त्यावर अथवा इतरत्र कचरा टाकतील त्यांचे वर कारवाई करणेचे आदेश दिले.

या सर्व चर्चेअंती उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी सध्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची बाब असलेने शहरातील कचरा उठावाचे काम सक्षमपणे करणेच्या सुचना दिल्या. कंपनी कडील काम करणारे सुपरवायझर..कर्मचाऱ्यांच्या विविध समस्याचे निराकरण केले.त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांच्या मध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. उपनगराध्यक्ष दालनात झालेल्या बैठकीत ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश मोरबाळे, मदन झोरे नगरसेवक मनोज हिंगमिरे, किसन शिंदे, मा.नगरसेवक, जहांगीर पट्टेकरी, बंडोपंत मुसळे, मुख्याधिकारी.इ.न.पा. डॉ.प्रदीप ठेंगल, आरोग्य अधिकारी डॉ.सुनिलदत्त संगेवार, आरोग्य विभाग प्रमुख विश्वास हेगडे, मुख्य स्वच्छता निरीक्षक सुर्यकांत चव्हाण, स्वच्छता निरीक्षक विजय पाटील, इचलकरंजी नगरपालिका आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षक, प्रभाग अधिकारी, मुकादम तसेच आदर्श फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिस तर्फे स्थानिक प्रतिनिधी मक्तेदार.इ.न.पा. राहूल गायकवाड, संतोष मोने, जयपाल लोखंडे व कंपनी कडील काम करणारे सुपरवायझर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.






