नाशिकचा कांदा निघाला बांगलादेशात

onion

नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि. कुबेर जाधव) – कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत व लासलगाव सह कळवण ,वणी ,देवळा येवला नांदगाव ,मालेगाव येथील बाजार समि त्यां मध्ये खरेदी केलेला कांदा रविवारी बांगलादेशला रवाना झाला. लासलगाव व पिंपळगाव बसवंत जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा कांदा कसबे सुकेणे रेल्वे स्टेशनवरून बांगलादेश व भारतातील इतर अंतर्गत मोठ्या बाजारपेठांसाठी ५५ रॅकने रवाना झाला.

नाशिक सह महाराष्ट्रातून उन्हाळ कांद्याची निर्यात किसान रेल्वेतून बांगलादेशात होत आहे. ही बाब अत्यंत स्वागतार्थ असून तिचं आम्ही स्वागतच करतो. नाशिक जिल्ह्यातून जास्तीत जास्त कांदा निर्यात व्हावा. यासाठी राज्य व केंद्र सरकारने सातत्याने प्रयत्न चालू ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून परदेशी चलन उपलब्ध होईल व कांदा उत्पादकांबरोबर व्यापाऱ्यांचा ही फायदा होईल.
– कुबेर जाधव, संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य
कांदा उत्पादक संघटना, नाशिक

गेल्या अनेक दिवसांपासूनप करोना महामारीत अडकलेल्या या नगदी पिकाची निर्यात सुरू झाल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कसबे सुकेणे येथील रेल्वे स्टेशन येथून सर्व बोगींमध्ये कांदा लोड करण्यात आला. यासाठी नाशिक जिल्ह्यातून वेगवेगळ्या कांदा व्यापाऱ्यांचा माल सुकेणे या ठिकाणी जमा झाला होता. सध्या कांदा पिकाला चांगला भाव मिळत असल्याने व परेदेशात व देशा अंतर्गत मागणी वाढत असल्याने त्याचा फायदा होतांना दीसत असल्याने शेतकरी, व्यापारी समाधानी आहेत. चांगल्या प्रतीचा कांदा सरासरी १८०० ते २२००रुपये क्विंटलप्रमाणे विकला जात आहे. देशांतर्गत बाजारपेठेसह परदेशामध्ये देखील भारतीय कांद्याला मोठी मागणी आहे. त्यामुळेच हा कांदा काही प्रमाणात निर्यात सुरू झाली आहे. ती अधिक वाढवण्याची आवश्यकता असल्याचे कांदा उत्तपादक संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव यांनी म्हटले आहे , चालू वर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने यंदा निर्यातही त्याप्रमाणात होणे गरजेचं आहे किमान पाच लाख टन कांदा निर्यातीसाठी प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे मत कुबेर जाधव यांनी व्यक्त केले आहे.

रविवारी एका रॅकमध्ये १६ हजार क्विंटल याप्रमाणे ५५ रॅकद्वारे ८ लाख ८० हजार क्विंटल कांदा रेल्वेने नेण्यात आला . कसबे सुकेणे रेल्वेस्थानक हे लासलगाव, पिंपळगाव, विंचूर, निफाड व सायखेडा या बाजारपेठांना मध्यवर्ती असल्याने व्यापाऱ्यांच्या सोयीनुसार मध्य रेल्वे प्रशासनाने कसबे सुकेणे माल धक्क्याचा विकासाचे नियोजन केले असल्याचे समजतते. तीन नंबर फलाटावरून सध्या कांदा रॅक उभी करून बांगलादेश व देशभरात कांदा पाठविला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here