धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – अँड. संजय महाजन यांची भाजप तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली होती. याच कार्याची दखल घेऊन पक्षाच्यावतीने त्यांना भाजप ओबीसी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, त्याबद्दल परीट समाजातर्फे सत्कार त्यांचा करण्यात आला.
येथील भूमिपुत्र अँड. संजयभाऊ महाजन यांचे अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदान सर्वांना परिचित आहे. भाजप पक्षाच्या माध्यमातून लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवतांना अतिशय कमी फरकाने त्यांचा पराभव झाला होता. भाजप पक्षाच्यावतीने अनेक आंदोलनात अँड. संजयभाऊ महाजन नेहमीच अग्रेसर असतात. भाजप तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली होती. याच कार्याची दखल घेऊन पक्षाच्यावतीने त्यांना भाजप ओबीसी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, त्या बद्दल समस्त परीट धोबी समजा तर्फे सत्कार करण्यात आला, त्या निमित्ताने समाजाच्यावतीने समाजाचे पंच मंडळ यांचा हस्ते अँड. संजयभाऊ महाजन यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी जेष्ठ जेष्ठ नेते प्रकाश बापू जाधव, जिल्हा संघटक छोटू भाऊ जाधव तालुका अध्यक्ष अशोक बंडू जाधव, शहर अध्यक्ष गणेश सुभाष जाधव,उपतालुका प्रमुख रवींद्र जाधव युवक शहर अध्यक्ष विनोद रोकडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी पुढील वाटचालीसाठी समस्त परीट धोबी समजा तर्फे शुभेच्छा व्यक्त केल्या. सत्काराला प्रतिउत्तर देत अँड. संजयभाऊ महाजन यांनी आभार मानतांना सागितले की, मी समाजाच्या विकास कामांसाठी व अडी-अडचणी सोडवण्यासाठी आपल्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून प्रयत्न करील, असे वचन समाजाच्या पंच मंडळास दिले.






