पती घटस्फोट देत नसल्याने पत्नीने त्याची हत्या करुन त्याचे गुप्तांगच तेलात तळले

ब्राझील – कधी कधी एखादी व्यक्ती क्रुरतेच्या कोणता कळस गाठेल याचा विचारही केला जाऊ शकत नाही. ब्राझिलमध्ये एका पत्नीने तिच्या पतीची हत्या करत त्याचे गुप्तांग चक्क तेलात तळून काढले आहे. पती तिला घटस्फोट द्यायला नकार देत होता म्हणून तिने हा भयंकर प्रकार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या महिलेला अटक केली आहे.

क्रिस्टिना रोड्रिग्ज असे त्या महिलेचे नाव असून तिचे आंद्रे नावाच्या तरुणासोबत लग्न झाले होते. त्यांच्या लग्नाला दहा वर्ष झाली होती. मात्र क्रिस्टिना व आंद्रे यांचे पटत नव्हते. दोन वर्षांपूर्वी ते एकमेकांपासून वेगळे झाले होते. मात्र आंद्रेने क्रिस्टिनाला समजावले व ते दोघे परत एकत्र राहू लागले. त्या दोघांना एक आठ वर्षांचा मुलगा व एक पाच वर्षांची मुलगी आहे.

क्रिस्टिना व आंद्रे परत एकत्र राहायला लागल्यानंतरही त्यांचे वाद थांबत नव्हते. त्यामुळे क्रिस्टिनाला आंद्रेपासून घटस्फोट हवा होता. मात्र आंद्रे तिला घटस्फोट द्यायला तयार नव्हता.त्यामुळे ती वैतागली होती. त्यामुळे क्रिस्टिनाने गेल्या आठवड्यात आंद्रेची चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर तिने त्याचे गुप्तांग कापले व त्याला डीप फ्राय केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here