औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आपल्या नियोजित दौऱ्यावर जात असताना रावसाहेब दानवे यांच्या ताफ्यासमोरच जालना-बदनापूर रोडवर दुचाकीस्वाराचा अपघात झाला. त्यावेळी दानवे यांनी आपला ताफा थांबवला आणि अपघातग्रस्ताला रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली.
आपल्या मतदारसंघातील कोरोनामुळे मृत्यू जालेल्या कुटुंबाच्या सांत्वनपर भेटीसाठी रावसाहेब दानवे दौऱ्यावर होते. या दौऱ्यावर असताना जालना-बदनापूर रोडवर दानवे यांच्या ताफ्यासमोरच एका दुचारीस्वाराचा अपघात झाला.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या ताफ्यासमोर बदनापूर-जामखेड रोडवर दुचाकीला अपघात. दानवे यांनी आपल्या ताफ्यातील पोलीस गाडीतून जखमींना रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली. @raosahebdanve @ChDadaPatil @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra #RaosahebDanve #BJP #ACCIDENT pic.twitter.com/xbRPzL8U7T
— sagar joshi (@spjoshi11) June 11, 2021
त्यावेळी दानवे यांनी आपला ताफा थांबवला. त्यांनी जखमींची विचारपूस केली आणि आपल्या ताफ्यातील एका पोलीस गाडीत जखमींना बसून जालना इथं उपचारासाठी पाठवून दिलं. तसंच जखमींच्या नातेवाईकांनाही अपघाताची माहिती दिली. दानवेंच्या या कृतीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.






