विजेची तार अंगावर पडल्याने शेतकरी पिता-पुत्राचा मृत्यू

उदगीर – वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात विजेची तार तुटून अंगावर पडल्याने पिता-पुत्राचा मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना उदगीर तालुक्यातील बामणी शिवारात शनिवारी दुपारच्या सुमारास घडली.

नारायण यादवराव कोडमंगले (50), मुलगा सिद्धरामेश्वर नारायण कोडमंगले (16, रा. बामणी, ता. उदगीर) हे दोघे दुपारी 3.25 वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन शेतातून घराकडे जात होते. अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला. जोरदार वाऱ्यामुळे विजेच्या खांबावरील तारा तुटून त्यांच्या दुचाकी व अंगावर पडल्या. या घटनेत विजेचा शॉक लागून बाप – लेकाचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्दैवी घटनेबद्दल बामणी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी देवणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here