नांदगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

अमरावती (विशेष प्रतिनिधी) – कोरोनाच्या वाढत्या संक्रमनामुळे रक्ताची कमतरता भासत असून आज अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला रक्ताची गरज आहे त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे
या शिबिरात सर्वांनी आपले सामाजिक दायित्व या नात्याने व आपल्या पवित्र दानाने अनेकांचे प्राण वाचू शकते आज अमरावती शहरात रक्ताची टंचाई भासत आहे आपली जबाबदारी म्हणून आपण या रक्तदानात आपलसुद्धा योगदान असू द्या आणि आपण आपल्या सोबत मित्र परिवाराना सुद्धा यात सहभागी करून घ्या, तसेच आपली रक्तदानाची आजच नोंदणी करा ७९७२८२७३७८नंबर वर करावी. रक्तदान शिबिर उद्या (दि.२९) बुधवार रोजी सकाळी १० ते दु १ दरम्यान गजानन महाराज मंदिर बस स्थानक परिसर नांदगाव खंडेश्वर येथे होणार असल्याचे युवा सेना जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here