जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात कालच कोरोनाने दहा हजारांचा टप्पा पार केल्यानंतर आज १२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संशयित रुग्णांचा तपासणीसाठी पाठविलेल्या स्वॅबचा आज अहवाल प्राप्त झाल्यानंतर २०५ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यात सर्वाधिक ६० रुग्ण जळगाव शहरातील आहेत. दुसरीकडे दिवसभरात 231 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यात आज मंगळवारी 205 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 60, जळगाव ग्रामीण 18, भुसावळ 20, अमळनेर 8, चोपडा 5, पाचोरा 13, भडगाव 8, धरणगाव 25, यावल 7, एरंडोल 4, जामनेर 9, रावेर 20, पारोळा 1, चाळीसगाव 6, व इतर जिल्ह्यातील 1 रूग्ण अशी संख्या आहे. दिवसभरात 12 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर, चाळीसगाव तालुका, जळगाव तालुका, याठिकाणचे प्रत्येकी 2 तर अमळनेर, भडगाव, यावल, रावेर, मुक्ताईनगर व भुसावळ या तालुक्यांमध्ये प्रत्येकी 1 याप्रमाणे बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.







