क्रुझर आणि खाजगी बसच्या भीषण अपघातात एक महिला ठार

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – जालना येथील अंबड टी पॉईंट जवळ एका खाजगी बस आणि क्रूझरचा भीषण अपघात झाल्याची घटना आज पहाटे सकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत एक प्रवाशी महिलेचा जागीच मृत्यू झाला तर आठ प्रवाशी गंभीर जखमी झाले. स्वाती अजय काळे (३०) हे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

हाती आलेल्या माहिती नुसार, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील चंदास येथील ९ प्रवासी क्रुझरने रामनगर साखर कारखाना येथे लग्न समारंभासाठी येत होते. त्यांच्या जीपला विदर्भातून येवतमाळ जिल्ह्यातून मुंबईकडे ३५ प्रवाश्यांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसने अंबड चौफुलीवर जोरदार धडक दिली.

दरम्यान, हा अपघात एवढा भीषण होता, की जीप पलटी खात कोसळली तसेच खाजगी बसचा समोरच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेदा झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here