परमबीर सिंह यांना न्यायालयानं दिला तूर्तास दिलासा.

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना मोठा दिलासा दिला आहे. 22 जूनपर्यंत त्यांना अटक करता येणार नसल्याचं उच्च न्यायालयानं राज्य सरकारला सांगितलं आहे. आज न्यायालय सुरु नसल्यानं न्यायमूर्ती एस.एस. शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत दाखल झालेला एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणीही तहकूब करण्यात आली आहे.

या याचिकेवर 22 जूनपासून नियमित सुनावणी होणार आहे. त्यामुळे पुढील सुनावणी होईपर्यंत परमबीर सिंह यांना अटक करणार नाही, असं सरकारी वकिलानं न्यायालयात हमी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here