चीनची लस घेतल्यास सौदी अरबमध्ये ‘नो एन्ट्री’

इस्लामाबाद – चीनच्या लसीवरुन पाकिस्तानच्या अडचणी काही कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. आता सौदी अरबने देखील चीनची लस घेणाऱ्यांना प्रवेश बंद केलाय. चीनची कोरोना लस सिनोफार्म आणि सिनोव्हॅकला ला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली असली तरी या देशांनी त्यावर बंदी घातलीय. सौदी अरबसह अनेक देशांनी चीनच्या लसींवर अविश्वास दाखवला आहे. म्हणूनच त्या लसी घेणाऱ्यांवर बंदी घालण्यात आलीय

पाकिस्तानमधील अनेक लोक सौदी अरबमध्ये काम करतात. अशातच सौदी अरबने ही बंदी घातल्याने पाकिस्तानच्या अडचणींमध्ये चांगलीच वाढ झालीय. पाकिस्तानचे मंत्री शेख रशीद यांनी सांगितलं होतं की पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान स्वतः या विषयात व्यक्तिगत लक्ष घालच आहेत. कारण सौदी अरबसह आणखी काही मध्य-पूर्वमधील देशही चीनच्या लसीला मान्यता देत नाहीयेत. डॉन वृत्तपत्रानुसार, सौदी अरबमध्ये केवळ फायझर, एस्ट्राजेनेका, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन या लसींना मान्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here