अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील विद्युतप्रभा कॉलनीतील रहिवासी पूजा राजेंद्र पाटील (२७) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही केल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.
पूजा ही रविवारी रात्री 9 वाजता तीचे आई वडील व भाऊ यांच्यासोबत गप्पा मारल्यानंतर घराच्या वरील मजल्यावर रूममध्ये निघून गेली. नंतर जेवणासाठी तिला आईने आवाज दिला असता तिने प्रतिसाद न दिल्याने त्यांनी वर जाऊन पाहिले असता, दरवाजा आतून बंद होता. खिडकीतून डोकावून पाहिले असता पूजा छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
रूमचा दरवाजा तोडून तिला उतरविण्यात आले,तिला सुरवातीला खासगी दवाखान्यात येथे नेले असता डॉ. संदीप जोशी यांनी मृत घोषित केले. यानंतर तीच मृतदेह अमळनेर ग्रामिण रुग्णालयात हलविण्यात आला, सोमवारी सकाळी तिचे शवविच्छेदन करून शहापूर येथे तिच्या मूळगावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.






