बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतला आढावा

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) – पुणे जिल्हा परिषदेने विविध योजना राबविल्या असून कचरामुक्त गाव, कचरामुक्त जिल्हा यासारख्या अनेक योजना हाती घेतल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करताना प्रभावीपणे त्या जनतेपर्यंत पोहचवा, अशा शब्दांत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना देत ‘कामाला लागा’ असा अप्रत्यक्ष संदेशच दिला.

पुणे जिल्हा परिषद गेल्या दोन तीन वर्षांत चांगल्या प्रकारे काम करत असून विविध योजना मार्गी लावल्या आहेत. त्याशिवाय आणखी काही योजना हातात घेतल्या आहेत. त्या योजनांबरोबर आता जिल्ह्यात कचरामुक्त गाव योजना राबिवण्यात येत आहे. यासाठी गावो गावी शोष खड्डे तसेच कचरा प्रकल्पाच्या दृष्टीने तयारी केली जात आहे. हे अभियान व्यापक स्तरावर नेण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे. तसेच ग्रामस्थांना येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात, अशाही सूचना सुप्रिया सुळे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामे व योजनांचा खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हा परिषदेत आढावा घेतला. करोना संसर्गाची स्थिती व त्याबाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजना व लसीकरण मोहिमेची माहितीही सुळे यांनी घेतली. यासोबतच अंगणवाडी सुधारणा कार्यक्रमाचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, तसेच जिल्हा परिषद समित्यांचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्य, सरपंच,सर्व विस्तार अधिकारी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here