जळगाव लोकसभेची जागा शिवसेना लढविणार – संजय राऊत

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – जळगाव येथे शिवसेनेचे नेते संजय राऊत हे आले असताना जळगाव लोकसभेची जागा शिवसेना लढविणार असल्याचे प्रतिपादन केले. जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी जि.प.सदस्य,नगरसेवक यांचा दोन दिवसाच्या दौरा आयोजित करण्यात आला.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना संजय राऊत यांनी सांगितले महाराष्ट्रातील तीन जिल्हे हे शिवसेनेचे बाले किल्ले असून त्यात जळगाव जिल्हा सुद्धा आहे एकाच वेळेस पाच आमदार देणारा हा जिल्हा असून पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची चांगली ताकद वाढली असून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाची ताकद पाहिली तर खासदार निवडून येण्याची परिस्थिती आहे.

sanjay-raut-meeting-with-shivsainik-at-jalgaon त्यातल्या त्यात जळगाव महापालिकेचे 30 भाजपा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला असून जास्त फायदा आपल्याला होईल मा गुलाबरावजी पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले जळगाव महापालिकेतील नगरसेवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला त्यांना योग्य न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू व जास्तीत जास्त निधी देऊन जळगाव महापालिकेचा निश्चित काया पालट करू असे आश्वासन दिले.

संजयजी सावंत संपर्क प्रमुख,आ.चिमणराव पाटील,आ.किशोरआप्पा पाटील, श्री गुलाबराव वाघ,श्री विष्णू भंगाळे,डॉ हर्षल माने आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केलीत.प्रमुख अतिथी म्हणून श्री कुणाल दरडे,आ.चंद्रकांत पाटील, मा.आ.चंद्रकांत सोनवणे,सौ महानंदा पाटील,उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,नगराध्यक्ष निलेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here