जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत धरणगाव तालुक्यातील 20महिलांना प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या मदतीचे धनादेश व एक महिन्याच्या किराणा , राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते येथील तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतंर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वर्षे वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियांना 20 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. त्यानुसार आज धरणगाव व तालुक्यातील 20महिलांना प्रत्येकी 20 हजार रुपये याप्रमाणे एकूण 4लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. या अर्थसहाय्यतून मुलांच्या शैक्षणिक बाबींवर खर्च करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी महिलांना केले. तसेच धरणगाव येथील एका महिलेस पिठाची गिरणी उद्धार निर्वाह साठी दिली तसेच एकलग्न येथील काळे यामहिलेस अंगणवाडी सेविका ची जागा रिक्त असल्याने तिला रुजू होण्याची ऑर्डर देण्यात आली तसेच पुढील प्रमाणे महिलांना 20 हजार चा धनादेश देण्यात आला

आशा शिवशंकर महाजन आनोरा, आशाबाई कौतिक शिरसाठ पथराड बु, सुरेखा पुनमचंद काळे एकलग्न बु, सरला संजय पाटील धरणगांव, वैशाली गजानन शिरसाठ धरणगांव, वंदना भटुलाल चौधरी धरणगांव, कविता संतोष पाटील धरणगांव, तरन्नुम शेख सलीम धरणगांव, अक्का कैलास पारधी धरणगांव, रामवती रतीलाल मोरावकर धरणगांव, सुनिता संतोष पाटील चांदसर बु, छाया सुकदेव भोई चांदसर बु, उषाबाई पिताबंर सोनवणे साळवा, सुशिला अनिल माळी साळवा, ज्योती शांताराम पाथरवट भामर्डी, विमलबाई भिवसन भिल वराड बु, रोहनाबी शेरखान पठाण बोरगांव खु, मिना केशव सुतार बोरगांव खु, रत्नाबाई संजु चौधरी धरणगांव, सुरेखाबाई इरभान शिरसाठ धानोरा या सर्व महिलांना पालकमंत्री गुलाबराव पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धनादेश देण्यात आला
या प्रसंगी उपस्थित शिवसेना लोकसभा सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ नगराध्यक्ष निलेश चौधरी, गटनेते विनय भावे, सभापती प्रेमराज पाटील , भगवान महाजन , विलास महाजन मोहन महाजन उपस्थित होते. तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी प्रास्ताविकात या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार लिपिक गायदानी यांनी मानले.






