मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – महाराष्ट्र नवनिर्मान सेना अध्यक्ष, मराठी हृदय सम्राट मा. राजसाहेब ठाकरे यांचे ५३ व्या वाढदिवसानिमित्त दि. १४/०६/२०२१ रोजी मौजे सिन्नर येथे महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्वांनी मिळून सुर्यवत विद्यमानाने महिला सिन्नर तालुका अध्यक्ष ॲड. सौ. भाग्यश्री सचिन ओझा व सिन्नर तालुका अध्यक्ष विलास सांगळे, महिला शहर अध्यक्ष दिपा पंढरीनाथ ढोली, शहर अध्यक्ष निखिल लहामगे यांचे समवेत सर्व मनसे सैनिकांनी मौजे सिन्नर येथील कानडी मळा येथे वृक्षारोपण केले.

यावेळी वृक्षारोपणाचे व ऑक्सिजनचे महत्व समजून सांगून ५३ वृक्षांची लागवड कानडी मळा, सिन्नर येथे केली. तसेच कोविड-१९ चा प्रादुर्भाव अतिशय जास्त प्रमाणात वाढला होता त्यावेळी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता, जिव धोक्यात टाकून खऱ्या अर्थाने कोविड-१९ योध्दा म्हणून काम करणारे सर्व सन्माननिय अधिकाऱ्यांचाही वृक्ष रोप देवून सत्कार केला.

यावेळी प्रांत अधिकारी श्रीमती गायकवाड मॅडम, तहसिलदार श्री. कोताडे, श्री.मुटकूळे यांचेवतीने सत्कार स्विकारार्थि श्री. जाधव व सर्व पोलीस पदाधिकारी व पोलीस वर्ग, सिन्नर जिल्हा ऋग्णालय येथील अधिक्षिका डॉ. लहाडे यांचेकडे प्रत्यक्षात भेट देवून सर्व मनसे पदाधिकारी व सैनिकांनी वृक्ष रोप देवून सत्कार केला व त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे आभार मानले.

यावेळी उपजिल्हाध्यक्ष अमोल जाधव, शरद घुगे, एकनाथ दिघे, कृष्णा पालवे, भिवाजी शिंदे, वैभव सिरसाठ, गणेश मुत्रक, पांडुरंग माळी, सुरज आव्हाड, लखन खर्डे, धनंजय बोडके, ज्ञानेश्वर कातकाडे, सिमा नेहे, बच्छाव ताई, कदम ताई व इतर मनसे सैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here