आदिवासी संघटनेकडून गुन्हेगारास फाशी देण्याची मागणी
शहादा (प्रतिनिधी संतोष कोळी) – शहादा तालुक्यातील ब्राम्हणपुरी येथील अल्पवयीन आदिवासी मुलीवर वारंवार बलात्कार करून गर्भवती केल्याप्रकरणी व गर्भपात करून भ्रूणहत्या करण्या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे.
शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील एका युवकाने अल्पवयीन अकरा वर्षीय आदिवासी मुलीला आमिष दाखवून वारंवार अत्याचार केला व तिला गर्भवती केले नंतर केलेले गुन्हा लपवण्यासाठी अल्पवयीन गर्भवती मुलीचा पाच महिन्याचा गर्भपात हा मध्यप्रदेशातील मलफा येथे घडवून आणला व भ्रूणहत्या करण्यात आली होती गर्भपात करण्यासाठी गावातील व्यक्तीने मध्यस्थता करून ओळखीच्या डॉक्टर व नर्सच्या मदतीने मध्यप्रदेशातील येथील एका शेतातील झोपडीत अनधिकृतरित्या गर्भपात घडवून आणला. तसेच सदर घटनेची बाहेर कुठे वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी पीडित मुलीला देण्यात आली आहे.
सदर प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक व उपविभागीय अधिकारी संभाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी तातडीने कारवाई करत बलात्कार करणाऱ्या नराधमास व इतर तिन्ही साथीदारांना पकडण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने सहाय्यकपोलीस निरीक्षक निलेश वाघ पोलीस कॉन्स्टेबल राकेश मोरे गोपनियचे शाखेचे मणिलाल पाडवी,मुकेश राठोड, धिरसिंग वडवी, दिनकर चव्हाण, भरत उगले , किरण जिरेमाळी या पथकाने बलात्कारातील आरोपी पंकज पाटील याना सापळा रचून मोठ्या शिताफीने शहादा तालुक्यातील सुल्तानपूर शिवारातील एका शेतातून पकडून जेरबंद केले.

या घटनेत गर्भपातासारखे दृष्कर्म करणाऱ्या डॉक्टर् व नर्स यांचा तपास अद्याप सुरू आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. सदर गुन्ह्याची भा.द.वि कलम 376,376AB,313,318,506, 34प्रमाणे व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण , अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार नोंद शहादा पो.स्टे.येथे करण्यात आली आहे. घटनेला कारणीभूत मुख्य सूत्रधार पंकज मंगा पाटील, अंबालाल पटेल,शांत्या पाटील, भुऱ्या शांत्या पाटील अशा चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक डॉक्टर व एक नर्स फरार आहेत. तरी गर्भपात करून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेला कारणीभूत नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी व ही केस जलदगती न्यायालयात चालविण्यात यावी अशा विविध मागण्या जिल्ह्यातील आदिवासी संघटनांनी केल्या आहेत.
पीडित अल्पवयीन आदिवासी मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून क्रूर कृत्य करणाऱ्या जबाबदार नराधमास फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तसेच इतर सहआरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही संघटनांकडून देण्यात आला आहे. सदरचा गुन्हा हा अल्पवईन मुलीवर तिला आमिष दाखवून बलात्कात केला आणि गर्भवती राहिली होती तिचे खाजगी डॉक्टर मार्फत गर्भपात करण्यात आला होता अशी दर्दनाक घटनेबाबत पोलीस स्टेशन ला माहिती मिळाल्यावर सदर बाबत त्वरित गुन्हा दाखल करू चार आरपीना अटक करण्यात आले असून सदरचा गुन्हा 376 , पोस्को,एट्रोरोसिटी सह दाखल करण्यात आला आहे पुडील तपास एस डीआओपी संभाजी सावंत हे करित आहेत. फॉरेन्सिक पथक अधिक माहिती साठी घटना स्थळी मध्यप्रदेश येथील मालफा येथे रवाना झाले असून पुढील तपास करीत आहेत.






