जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – ॲड.संजय महाजन यांची भाजप तालुकाध्यक्ष म्हणुन केलेल्या कार्याची दखल घेवुन पक्षाच्यावतीने त्यांची भाजप ओबीसी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांचे अनेक वर्षा पासुन सामाजिक व राजकिय क्षेत्रातील योगदान सर्वांना परिचित आहे, त्यांच्या या नियुक्तीबद्दल माळी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या निमित्तांने समाजाचा वतीने समाज अध्यक्ष रामकृष्ण महाजन यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित उपाध्यक्ष शिवाजी देशमुख,उपाध्यक्ष विलास महाजन, सहखजिनदार राजेंद्र महाजन, सचिव सुधाकर महाजन,संचालक सुभाष पाटिल, गुलाब महाजन, राजेंद्र महाजन, धिरज महाजन, भगवान महाजन, चैत्राम महाजन, विजय महाजन उपस्थित होते.
याप्रसंगी पुढील वाटचालीसाठी माळी समाजाचा पंच मंडळांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. संजय महाजन यांनी आभार मानतांना समाजाचा उन्नती तसेच संघटन, समाजाचा विकासासाठी मी आपल्या मागे खंबीरपणे उभे राहिल असे वचन दिले.






