विज्ञान प्रयोग प्रदर्शन 2021 मध्ये गट पहिला समुद्री लाटापासून वीज निर्मिती प्रकल्पाला पारितोषिक

अलिबाग  (प्रतिनिधी राजेश बाष्टे) –राष्ट्रीय स्तरावरील जीएमआरटी व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात आलेल्या विज्ञान प्रयोग प्रदर्शन 2021 मध्ये गट पहिला मध्ये अलिबाग येथील चिंतामणराव केळकर विद्यालय ची स्वरा अविनाश पाटील हिच्या समुद्री लाटा पासून वीज निर्मिती या प्रकल्पाला तृतीय क्रमांक मिळाला. ऑनलाईन बक्षिस समारोहा साठी इस्रो व बी ए आर सी चे शास्त्रज्ञ सुद्धा उपस्थित होते.

यासाठी देशभरातून 1200  विद्यार्थी सहभागी झाले होते.जवळजवळ 539 विज्ञान प्रयोगांतून अंतिम फेरीत फक्त 15 प्रयोग निवडून त्यांची ऑनलाइन पद्धतीने वेगवेगळ्या  शास्त्रज्ञांनी व  मूल्यमापन कमिटीने मुलांची अतिशय चौकस पणे परीक्षा घेतली.यामध्ये मुलांचे योगदान व चौकस बुद्धी व जिज्ञासू वृत्ती यावर गुणदान  करण्यात आले. राष्ट्रीय प्रमाणपत्र व ट्रॉफी हे बक्षिसाचे स्वरूप आहे. या

स्पर्धेमध्ये  अलिबाग येथील चिंतामणराव केळकर शाळेतील मुख्यध्यापिका सरोज मळेकर व सहशिक्षिका प्राजक्ता वार्डे यांनी मार्गदर्शन केले तसेच कोकण विभाग प्रमुख श्री संदीप वारगे सरांनी बहुमोल सहकार्य केले. त्यामुळे सर्व स्तरातून स्वराचे, शाळेचे व तिच्या पालकांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here